फायनान्स

गुंतवणूकीचा श्रीगणेशा

नमस्कार… सर्वप्रथम गणेश चतुर्थी निमित्त तुम्हाला शुभेच्छा, आतापर्यंत तुम्ही बिझनेस सुत्रा च्या इंस्टाग्राम पोस्ट बघत होता ज्यात अगदी थोडक्यात माहिती देत होतो पण आजपासून बिझनेस सुत्रा डिजिटल ची एक स्वतंत्र वेबसाईट आपण सुरू करतोय ज्यावर तुम्ही सविस्तर गोष्टी शिकू शकाल, समजू शकाल आणि तुमच्या आयुष्यात वापरू शकाल.

गुंतवणूकीचा श्रीगणेशा

मित्रांनो मला स्वतःला काही वर्षांपूर्वी Asset आणि Liability मधला फरक देखील माहिती नव्हता, पण जेव्हापासून मी पुस्तके वाचू लागलो आणि माझ्या वाचनात रिच डॅड पूअर डॅड हे पुस्तक आले तेव्हा मला ह्या सर्व गोष्टी समजू लागल्या आणि पैशाने पैसे वाढता व पैशांना आपण कामाला लावू शकतो ही गोष्ट ना आपल्याला आपले घरचे सांगतात ना आपल्याला शाळेत शिकवतात.. त्यामुळे आपल्याला स्वतःला असे पुस्तके वाचून स्वतः अभ्यास करून आर्थिक सक्षम होण्याची गरज आहे, आणि आजच्या काळात तर यूट्यूब, गूगल आणि बिझनेस सुत्रा डिजिटल सारख्या गोष्टींमुळे ह्या गोष्टी शिकणे अधिक सोप्पे आणि मजेशीर झाले आहे.

मित्रांनो तुम्हाला भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्हाला पैशांना कामाला लावलेच लागेल नाहीतर मरेपर्यंत तुम्हाला कामाचं करावे लागेल

आज आपण गुंतवणुकी चे काही मार्ग बघणार आहोत ज्यापैकी पहिले ५ मार्ग कमी रिस्क असलेले आणि गुंतवलेल्या रकमेवर ठेवलेल्या व्याजदराप्रामाने रिटर्न मिळतात, यात जसी रिस्क कमी तसेच रिटर्न पण कमी असतात.

१) फिक्स डिपॉजिट (FD)

भारतात सर्वसामान्य लोकांमध्ये FD हा सर्वात जास्त आवडीचा मार्ग आहे, यात तुम्ही गुंतवलेल्या रकमेचा कालावधी संपल्यावर तुम्हाला किती रक्कम मिळेल म्हणजेच Maturity Amount आपल्याला आधीच माहीत असते. FD मध्ये गुंतवणुक करण्यासाठी सर्व रक्कम ही एका वेळेस जमा करावी लागते तुम्ही १ हजार पासून कितीही रुपये ची FD करू शकता. तुम्ही जेवढा जास्त काळासाठी पैसे ठेवता तेवढा जास्त व्याजदर तुम्हाला मिळतो सध्याचा वार्षिक व्याजदर साधारण ३-७ % आहे.

हे पण वाचा :  चला जाणून घेऊया पैशाचं मानसशास्त्र

२) रिकरिंग डिपॉजिट (RD)

ज्या लोकांना FD मध्ये एका वेळेस एवढी रक्कम जमा करणे शक्य नसते ती लोक RD हा पर्याय निवडू शकता. RD मध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम टाकून तुमची गुंतवणूक करता येते, तुम्ही कमीत कमी १०० रुपयांपासून RD करू शकता, ६ महिने ते १० वर्ष कालावधीसाठी ही गुंतवणुक असते आणि RD चे व्याजदर २.५ ते ५.५% मिळते.

३) लाईफ इन्शुरन्स पॉलिसी

लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ही घरातील जबाबदार व्यक्तीने कुटूंबाच्या सुरक्षतेसाठी काढण्यात येणार पॉलिसी आहे. या मध्ये पॉलिसी चालू असताना पॉलिसी धारकाला काही झाले तर त्याच्या कुठुंबाला पॉलिसी ची सर्व रक्कम मिळते.. अनेक प्रकारचे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असतात.

४) PPF (पब्लिक प्रोविडेंट फंड)

PPF मधील गुंतवणुक ही रिटायरमेंट प्लॅन म्हणून ओळखली जाते, यामध्ये वर्षाला कमीत कमी ५०० रुपये तुम्हाला जमा करावे लागता आणि या पॉलिसी च एकूण लॉकिंग कालावधी २१ वर्षांचा असतो. सध्या PPF चे चालू व्याजदर ७% आहे.

५) नॅशनल पेन्शन स्कीम

नॅशनल पेन्शन स्कीम देखील एक रिटायरमेंट स्कीम आहे. यामध्ये वर्षाला कमीत कमी ५०० रुपये जमा करावे लागतात.
यामध्ये तुम्ही भरलेल्या रकमेची ६०% रक्कम तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी मिळते आणि उरलेली रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून तुम्ही हयात असे पर्यंत मिळते, ६० वर्षाच्या आत तुम्हाला काही झालेच तर पूर्ण रक्कम आणि जमा झालेले व्याज तुमच्या कुटुंबाला मिळते.

आता आपण नॉन फिक्स रिटर्न मार्ग ज्यात रिस्क आणि परतावा दोन्ही जास्त असते असे मार्ग बघुयात :

१) रिअल इस्टेट

रिअल इस्टेट मध्ये तुम्ही घर किंवा जागा विकत घेऊन नंतर ती विकू शकता, रिअल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक किती नफा मिळवून देईल हे त्या जागेच्या भविष्यातील विकासावर अवलंबून असते. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त प्रमाणात रक्कम असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :  आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण का आहे गरजेचं..?

२) सोनं (GOLD)

आपल्या देशात अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. मागील १०-१२ वर्षात गुंतवणूकदारांना २००% पर्यंत नफा मिळाला आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करताना सोन्याचे वळ किंवा सोन्याचे बिस्कीट घेतलेले फायद्याचे असते कारण ते परत विकताना कुठीलीही घट त्यामध्ये होत नाही आणि यामुळे आपला नफा वाढतो.

३) चलन गुंतवणूक (currency investment)

चलन गुंतवणूक मध्ये कुठल्याही चांगल्या प्रगती करणाऱ्या देशाचे चलन कमी किमतीत विकत घेऊन त्याची किंमत वाढली की तुम्ही चांगला नफा मिळवू शकता पण किंमत जर कमी झाली तर तोटा देखील होऊ शकतो.

४) Mutual funds

Mutual fund मध्ये आपण आपल्या सोयनुसार गुंतवणुक करू शकतो जसे की Lumpsum म्हणजे एकसाथ मोठी रक्कम गुंतवणे किंवा प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवणे म्हणजे SIP. ५०० रुपयांपासून तुम्ही Mutual funds मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. यावर लकरच एक सविस्तर पोस्ट देखील लवकरच बनवू म्हणजे तुम्हाला या बद्दल सविस्तर माहिती मिळेल.

५) शेअर मार्केट

सर्व गुंतवणुकी पेक्षा सर्वात जास्त प्रॉफिट मिळवून देण्याची क्षमता शेअर मार्केट मध्ये आहे पण यासोबत सर्वात जास्त रिस्क देखील शेअर मार्केट मध्येच आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करताना आधी अभ्यास करा, शिका आणि हळू हळू सुरुवात करा. कारण ज्याप्रमाणे लोक शेअर मार्केट मुळे अब्जावधी रुपये कमवतात त्याप्रमाणे काही लोक खूप पैसे गमवून बसतात आणि याच कारण म्हणजे पूर्ण माहिती नसताना, शेअर मार्केट ला जुगार समजून अंदाजे गुंतवणुक करणे.. त्यामुळे तुम्ही जर सुरू करणार असाल तर आधी शिकायला सुरुवात करा, यूट्यूब वरती तुम्हाला काही चांगले चॅनल मिळतील जे सविस्तर आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट शिकवतात.

तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यासाठी एका डिमॅट अकाउंट ची गरज असते, आणि पुढील लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचं मोफत डिमॅट अकाउंट ओपन करू शकाल.
लिंक : https://tinyurl.com/y2c5uugr

हे पण वाचा :  आर्थिक साक्षरतेकडे पहिले पाऊल

निष्कर्ष :

तुम्ही या पोस्ट मध्ये गुंतवणुक करण्यासाठी ५ कमी रिस्क असलेले आणि कमी नफा असलेले तर ५ जास्त रिस्क सोबत जास्त नफा मिळवून देणारे मार्ग बघितले. आशा करतो तुम्हाला सर्व माहिती समजली असेल, ही माहिती तुमचा मित्रांना व नातेवाईकांना शेअर करायला विसरु नका.

2 Comments

  1. आपल्या सर्वांचे लाडके BSD चे संस्थापक किरण पाटील सर यांचे मनपूर्वक आभार आपच्या सारख्या बेरोजगाराना त्यांनी एक जगण्याची उमीद दिली व व्यवहार ज्ञान व तसेच बिझनेस ज्ञान या दोन्ही गोष्टी नीट व सुस्वच भाषेत समजून सांगितले त्यास साठी मी किरण पाटील सरांचा खूप ऋणी आहे कायसम आमच्या सोबत रा आणि आम्हाला असेच नवनविन बिझनेस आयडिया देत रा पुन्हा एकदा खूप खूप आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कॉपी नाही होणार भावा ! त्यापेक्षा शेअर कर.