उद्योजक यशोगाथा
Trending

देशातील सर्वात मोठ्या वाईन तयार करणाऱ्या सुला कंपनीचा येणार IPO त्यापूर्वी आपण जाणून घेऊन मराठी माणसाने कसा उभा केला, भारतातील सर्वांत मोठा वाइन ब्रँड.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत पदवीधर झालेले राजीव सामंत यांना कॅलिफोर्नियामध्ये ओरॅकल मधला जॉब बरोबर अमेरिकेच्या धावपळ जीवन आवडत नव्हतं मग ते खेड्यात राहण्याचा निर्णय घेत राजीव भारतात परतले, नाशिकजवळील दिंडोरी गावात त्यांच्या कुटुंबाची 20 एकर जमीन होती. ‘केरी डांसकी’ या अनुभवी वाईन तयार करणाऱ्या व्यक्तीची राजीव सामंत यांनी भेट घेतली. नाशिकच्या वाईनसाठी उपयुक्त वातावरणाबद्दल त्यांनी केरी यांना सांगितलं. दोघांनी एकत्र येऊन नाशिकच्या जागेत वाईन तयार करण्याचा प्लॅन्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. सन 1996 मध्ये, नाशिकचे हवामान व येथील जलवायूवा बनविणाया द्राक्षाच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे राजीव यांना उमजले. राजीव यांनी “सुला” नाव आपली आई सुलभा नावावरून ठेव होते, 20 एकर क्षेत्रात सुरू झालेली ही वाईनयाई आज 1800 एकर परिसरात पसरली आहे.

सुला ही आर्थिक वर्ष 2009 पासूनच सेल्स व्हॉल्युम आणि व्हॅल्यूच्या दृष्टीने भारतीय वाईन इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी वाईन उत्पादक, विक्रेता आणि मार्केट लीडर आहे.

सुला वाईन्स’ आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इटली सारख्या ३० देशांमध्ये वाईनची निर्यात करत असते.

IPO बद्दल माहिती

सुला वाईनयार्ड्स ही भारतातील सर्वात मोठी वाइन उत्पादक कंपनी आहे. तिला IPO द्वारे निधी उभारण्यासाठी SEBI ची मान्यता मिळाली आहे. सुलाचा पब्लिक इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. सुला वाईनयार्ड्सने या वर्षी 18 जुलैला ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. OFS अंतर्गत ऑफर केल्या जाणाऱ्या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे.

सुला वाईनयार्ड्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणारी पहिली वाइन तयार करणारी कंपनी असेल. त्याच वेळी, अल्कोहोल आणि स्पिरिट्स विभागात आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी असेल.

आयपीओमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला आधी डीमॅट खाते उघडावे लागेल. याशिवाय तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. आणि Angel one सोबत अगदी मोफत डिमॅट खाते सुरू करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://tinyurl.com/y2c5uugr

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कॉपी नाही होणार भावा ! त्यापेक्षा शेअर कर.