उद्योगवार्ताफायनान्स
Trending

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण का आहे गरजेचं..?

मिञांनो तुम्ही एवढ्यात सगळीकडे बघत असाल की आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे चालू आहे. शासन जाहिरातींमार्फत वारंवार लिंक करण्यासाठी आवाहन करत आहे. तर आज आपण आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण का एवढं गरजेचं आहे ते बघुया.

आधार कार्ड सरकारी संविधान साठी खूप महत्वाचं आहे तर पॅन कार्ड income tax department द्वारा असलेले खूप महत्वाचं कार्ड आहे. १ जुलै २०१७ च्या आधी पॅन कार्ड धारकांना आधार कार्ड लिंक करण गरजेचं नव्हत. पण जुलै २०१७ नंतर जर तुमच्याकडे पॅन कार्ड आहे तर आधार सोबत लिंक करण आवश्यक आहे.

१) सरकारी योजना साठी :

आजकाल खूप साऱ्या सरकारी योजना मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण गरजेचं सांगितलं जातं आणि जर तुम्ही हे लिंक केलेले नसेल तर तुम्हाला पुढे अश्या काही सरकारी योजनांचा लाभ देखील घेता येणार नाही.

२) income tax return ITR भरण्यासाठी :

आधार कार्ड लिंक करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे income tax return (ITR) भरण्यासाठी, तुम्हालाही माहीत असेल की ITR भरण्यासाठी पॅन कार्ड लागते. आणि यासाठी पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण गरजेचं आहे. जर आधार लिंक असेल तर तुम्हाला income tax return भरण्यासाठी पॅन कार्ड ची आवश्यकता नसेल कारण आधार कार्ड सोबत पॅन कार्ड ची सर्व माहिती लिंक होऊन जाते.

३) Duplicate पॅन कार्ड साठी :

समजा तुमचं पॅन कार्ड गहाळ झाला म्हणजे हरवलं किंवा चोरी झालं, तर तुम्हाला Duplicate पॅन कार्ड बनवावे लागते आणि यासाठी देखील आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक असणं गरजेचं आहे कारण जर आधार कार्ड लिंक असेल तर ही प्रोसेस सोप्पी होते आणि तुम्हाला duplicate पॅन कार्ड लवकर मिळून जाते.

हे पण वाचा :  गुंतवणूकीचा श्रीगणेशा

४) मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी :

तुम्हाला हे माहीतच असेल की आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण देखील महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर आधार सोबत पॅन कार्ड लिंक केलेलं असेल तर ही मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रोसेस देखील लवकर होते आणि यामुळे तुमचे इतर काम सोप्पे आणि लवकर होऊन जातात.

५) बँक खाते लिंक करण्यासाठी :

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे बँक खात्यासोबत लिंक असण्यासाठी, तुम्ही बघितल असेल की सर्व बँक्स आपल्याला बँक अकाउंट सोबत आधार लिंक करायला सांगतात पण जर तुम्ही हे दोन्ही लिंक केलं तर तुमची बँक डिटेल्स लवकर verify होऊन जाते आणि बँकेच्या संबंधित सर्व काम लवकर होऊन जातात.

तुम्हाला वरील ५ गोष्टींमधून आधार कार्ड सोबत पॅन कार्ड कार्ड लिंक करण का एवढं गरजेचं आहे हे लक्षात आलंच असेल.

आता हे समजून घेऊ की आधार आणि पॅन दोन्ही कार्ड चे कामे वेगवेगळी आहेत आधार कार्ड एक identity proof आहे ज्यात तुमची वयक्तिक माहिती असते थोडक्यात तुमची ओळख असते.

पॅन कार्ड हे financial document आहे यात तुमचं PAN number असतो यात तुमचं income आणि tax ची सर्व माहिती असते. यासोबत तुमचा सर्व आर्थिक देवाण घेवाण ट्रॅक केली जाते.

तुमची वयक्तिक माहिती आणि financial माहिती दोन्ही कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण आवश्यक आहे.

जर तुम्ही अजूनही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कॉपी नाही होणार भावा ! त्यापेक्षा शेअर कर.