मुंबई मधनं 1.5 वर्षान पासून बेपत्ता असलेली आई आषाढी एकादशी च्या दिवशी पंढरपूर मध्ये सापडली…! ते देखील एका इंस्टाग्राम रिल वरण..
हा लेख पूर्ण बघा तुम्हाला पंढरपूर चा विठ्ठल आजही आहे याची श्वास्वती मिळेल ही तुम्हाला मूवी ची स्टोरी वाटेल पण हे अगदी कालच झालेली खरी गोष्ट आहे ज्याचा अनुभव मी @kiran_patil1202 स्वतः घेतलाय…
तर शिवाजी धुते @shivajidhute हे सोलापूर चे फोटोग्राफर पंढरपूर मध्ये आलेले फोटो व्हिडिओस काढण्यासाठी… त्यांनी एक random विडिओ काढलेला ज्या मध्ये एक छोटा मुलगा 20 रुपयांचे रेनकोट विकतोय… त्या मुलाचा संघर्ष दाखवणारा हा विडिओ माझ्या नजरेत आला आणी मी @kiran_patil1202 तो आपल पेज @businesssutra_digital (बिझनेस सुत्रा डिजिटल) वर टाकला…
हा विडिओ चांगलाच viral गेला.. आणी परवा 16 तारखेला मला एक कॉल आला मुंबई वरण… शेखर नाव होत त्यांच आणी ते बोलले कि, आपने इन्स्टा पे एक विडिओ डाला हे.. जिसमे एक औरत दिखाई दे रही है.. वो मेरी माँ है.. और वो लापता है.. पिछले एक साल से हम उसे ढुंढ रहे है! त्याने मला स्क्रीनशॉट सेंड केला आणी आणखी एक फोटो आणी ती त्यांची आई आहे हे नक्की झालं..!
तर तो विडिओ कधी काढलाय ह्या साठी मी शिवाजी दादांना conncet केलं तर विडिओ अगदी 2 दिवसापूर्वी चा होता…
मी शेखर ला पंढरपूर चा लोकेशन सेंड केलं आणी विडिओ चंद्रभागे च्या तीरी काढलेला ते exact expalain केलं…
मित्रांनो… शेखर आणी त्याचा एक मित्र काल एकादशी च्या दिवशी पंढरपूर मध्ये आले.. एवढ्या हजारोच्या गर्दीद त्यांना त्यांची आई अगदी सहज सापडली… आणी ते सुखरूप घरी देखील गेले…!
हा योगायोग तर नाही म्हणता येणार ना!
शिवाजी दादांनी @shivajidhute त्या मुलाचा विडिओ काढणं.. त्या विडिओ मध्ये त्या मुलाने सुट्टे पैसे आणण्यासाठी सुरज च्या आई कडे धावत जाण.. आणी ते देखील फोटोग्राफर शिवाजी दादांनी कॅमेरा मध्ये कैद करणं.. तो विडिओ मला randmoly दिसणं.. आणी असे विडिओ पेज वर टाकत नाही बिझनेस रिलेटेड विडिओ टाकतो तरीही तो विडिओ मला टाकावं वाटणं.. तो विडिओ viral जाण आणी तो मुंबई मधल्या शेखर पर्यंत पोहचणे जो कि मुळात south indian आहे त्याला marathi पण समजतं नाही.. त्याने कॉल करून लोकेशन घेणं आणी आषाढी एकादशी च्या दिवसी.. एवढ्या गर्दीत सुरज ला 1.5 वर्षाने त्याची आई सापडणे….
व्हिडिओ खाली देत आहेत नक्की बघा, आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.