श्री कृष्णाने भगवत गीतेत सांगितलेल्या या ३ गोष्टी जाणून घ्या ; आणि आनंदी जगा
नमस्कार मित्रांनो आपण काही महत्वाचे लेसन्स बघणार आहोत हे श्री कृष्णाने भगवत गीता मध्ये सांगितले आहेत आणि या लेसन्स मधून तुमच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतील…
चला तर या लेसन्स ला सविस्तर बघुया
जे झालं ते चांगल्यासाठी झालं
जे होतय ते देखील चांगल्यासाठी होतय
जे पुढे होईल ते देखील चांगल्यासाठीच होईल
तुम्ही ज्या पण गोष्टींचा अती विचार करताय टेन्शन घेताय ते विसरून जा.
जो जॉब तुम्हाला नाही मिळाला, किंवा जे रिलेशनशिप जास्त काळ नाही टिकली ते होणारच होत, आणि ते झालं देखील.. everything happens for a reason जे होत त्यामागे एक कारण असत.
तुम्ही वाईट दिवसातून जाताय त्याच देखील एक कारण आहे, जेव्हा तुम्ही खूप चांगले दिवस बघता त्याच देखील एक कारण आहे, हे एक cyle आहे आणि ते तुम्हाला मान्य करावं लागेल.
तुम्ही फक्त वर्तमानात आनंदाने जगा आणि तुमच्या स्वप्नासाठी मेहनत करत रहा.
माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे
पण कर्मफळ माणसाच्या हातात नाही
आज आपण फक्त पैसे, गाडी, घर या गोष्टींसाठी काम करतोय.. आपल्याला गोल्ड achive करायचे आहेत म्हणून आपण फक्त result च विचार करत बसतो.. पण आपण जर आपल्या कामातून खूप जास्त अपेक्षा ठेवल्या आणि जर त्या पूर्ण नाही झाल्या ते खूप त्रास होतो.
त्यामुळे कोणतीही अपेक्षा न करता काम करत राहणं हे महत्वाचं आहे
जेव्हा आपण ध्येयावर काम करत असतो तेव्हा येणाऱ्या रिझल्ट च विचार करताना फेल होण्याची भीती आपल्या मनात येते आणि रिझल्ट positive नाही मिळाला तर आपण dipress पण होतो त्यामुळे फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा येणाऱ्या रिझल्ट चा विचार करू नका.
Change is the law of universe
बदल हा विश्वाचा नियम आहे
आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट permanent नाहीये. पृथ्वी नेहमी फिरत असते, दिवसानंतर रात्र आणि पुन्हा दिवस हे cyle फिरत असत आणि यावरून तुम्हाला कळेल की बदल हाच विश्वाचा नियम आहे.
त्यामुळे तुमच्या पैशांवर, श्रीमंतीवर घमंड करणं व्यर्थ आहे ते क्षणात गायब होऊ शकत आणि जर तुम्ही गरीब असाल तर तुमचे देखील दिवस बदलू शकता, फक्त मेहनत करत रहा.
हे ३ आणि छोटेसे पॉइंट्स अगदी सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर आवडल असेल तर मित्रांना शेअर करायला विसरु नका.
💯